केज दि.११ – शेतातील बांधावर गवत कापत असलेल्या एका २० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना धारूर तालुक्यातील एका गावात घडली. याप्रकरणी युसुफवडगाव पोलीसात दोघाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
धारूर तालुक्यातील एका गावातील २० वर्षीय महिला ही शनिवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास शेतातील बांधावरील गवत कापत होती. ती एकटीच असल्याची संधी साधून दादाराव बाळा लांब, हरिभाऊ बाळा लांब ( रा. चिंचपूर ता. धारूर) या भावांनी महिलेसोबत लज्जास्पद कृत्य करून विनयभंग केला. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून दादाराव लांब, हरिभाऊ लांब या दोघा विरुद्ध युसुफवडगाव पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार राठोड हे पुढील तपास करत आहेत.