अंबाजोगाई दि. ११ – ( पांडुरंग केंद्रे) आर्मीचा अधिकारी असल्याची माहिती सांगुन मोबाईल वरुन संपर्क साधला व अंबाजोगाई येथे कॅम्प होणार असून त्यासाठी १५व्यवसायिक गॅस कनेक्शन हवे आहेत. त्यासाठी रक्कम आॅनलाईन पाठवा. ते आमच्या हेड ऑफिसवरुन रिफंड होतील अशी थाप मारुन शहरातील गॅस विक्रेत्यांकडून १लाख ३५ हजार ४१५ रुपयांची रक्कम भामट्याने लंपास केली.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. दिवसेंदिवस लाखोंच्या रक्कमा लांबल्या जात आहेत. अशा चोरट्यांचा तपास लावणे अव्हानात्मक ठरु लागले आहे. असाच प्रकार अंबाजोगाईत समोर आला आहे. शहरातील अभय संजय पवार हे खाजगी एजेंसी चालवतात. ८ सप्टेंबर रोजी दोन अनोळखी फोनवरून काॅल आला, मी आर्मीमधुन बोलतोय, आमचा अंबाजोगाई येथे कॅम्प होणार आहे. त्यासाठी आम्हाला १५ व्यवसायिक गॅस कनेक्शन पाहिजेत. त्याचे पैसे आमच्या हेडआॅफीसवरुन रिफंड होतील. त्यानंतर त्यांच्यावर विश्वास ठेवून पवार यांनी त्याला ९ हजार रुपये रक्कम पाठवली. त्यानंतर आॅनलाईन चालू आहे असे वेळोवेळी सांगत एकुण १ लाख ३५ हजार ४१५ रुपये पाठवण्यास भाग पाडले. ही रक्कम पाठवल्या नंतर पवार यांना कसलाही रिफंड मिळाला नाही.
दरम्यान, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी १० सप्टेंबर रोजी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. यावरून अज्ञातावर गुन्हा नोंद झाला आहे. पोनी पवार पुढील तपास करीत आहेत.