केज दि.१४ – शेतात दोऱ्या टाकण्यावरून एका तरुणास दगडाने मारहाण करीत हाताला चावा घेतल्याची घटना केज तालुक्यातील मुंडेवाडी येथे घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मुंडेवाडी येथील संतोष अनंत घोळवे ( वय २८ ) हा तरुण मंगळवारी सकाळी १० वाजता त्याच्या भोकर नावाच्या शेतात असताना श्रीराम बाबासाहेब घोळवे हा तिथे आला. त्याने तू व तुझे वडील शेतात दोऱ्या का टाकतात असे म्हणत दगडाने संतोष याच्या हाताच्या कोपरावर मारहाण करून हाताला चावा घेत जखमी केले. जीवे मारण्याची धमकी ही दिली. संतोष घोळवे याच्या फिर्यादीवरून श्रीराम घोळवे याच्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला असून जमादार जयवंत शेप हे पुढील तपास करत आहेत.