Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यात सौरपंपची चोरी….!  

केज तालुक्यात सौरपंपची चोरी….!  
केज दि.१८ – सोनीजवळा येथील शेतकरी उस्मान फतरु शेख यांच्या शेतातील विहिरीवरील ३८ हजार रुपये किंमतीची विद्युत पानबुडी मोटार अज्ञात चोरट्यांनी १६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना ताजी असतानाच
देवगाव ता.केज येथे विहिरीवर बसविलेला सौरपंप मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
       देवगाव येथील शेतकरी छंदर रामराव मुरकुटे यांनी शेतातील विहिरीवर १६ हजार ५६० रुपये किंमतीची सौरपंप मोटार बसविलेली होती. शेतात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी सौरपंप मोटार चोरून नेल्याची घटना १७ सप्टेंबर सकाळी १० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. छंदर मुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध केज पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून जमादार जसवंत शेप हे पुढील तपास करत आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version