उस्मानाबाद दि.19 – समाजात अज्ञानाचा आणि गरजेचा कोण कसा गैरफायदा घेईल याचा काही नेम राहिलेला नाही. माणूस कितीही अडचणीत असला तरी त्याचे भान अनेकांना राहिलेले नाही. आणि असाच एक प्रकार ऊस्मानाबाद जिल्ह्यात घडला असून जिल्ह्यातील एका बोगस डॉक्टराला बार्शी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. रुग्णाला किडनी देतो म्हणून १ लाख ७० हजाराला या बोगस डॉक्टराने फसवले असून मुलाला वाचवण्यासाठी शेतकरी बापाची या बोगस डॉक्टराने फसवणूक केली आहे.
सदरील भामटा 12 वर्षा पासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले असता त्यांनी प्रदीपशी संपर्क करून पैसे मागितले असता मी डॉक्टरच नाही मी तुला पैसे देऊ शकत नाही, तुला काय करायचे ते करून घे असा दम त्याने नितीन च्या वडिलांना दिला असता त्यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली व बोगस डॉक्टर प्रदीप सुतार वर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले असून बार्शी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे.
दरम्यान बोगस डॉक्टर प्रदीप सुतार गेली बारा वर्षा पासून बार्शी, कोल्हापूर, सांगली या परिसरात वैद्यकीय व्यवसाय करत होता. या कालावधीत त्याने अनेक लोकांना फसवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.