केज दि.२० – केज उपविभागाला पंकज कुमावत (आयपीएस) दर्जाचे उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून लाभले आहेत. बऱ्याच कालावधीनंतर एक धाडसी आणि तरुण अधिकारी लाभल्याने अवैध धंद्यांवर अंकुश येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
अखिलेश कुमार सिंग यांच्यानंतर केज उपविभागाचा कारभार हा बरेच वर्ष अतिरिक्त कार्यभारावर चाललेला आहे. पदाचे आले परंतु त्यांचाही कार्यकाळ जास्त दिवसाचा न राहिल्याने त्यांनाही आपली छाप पाडता आली नव्हती. केज उपविभाग तसा लहान जरी असला तरी गुन्हेगारीचे प्रमाण त्या मानाने जास्त आहे. महिला अत्याचार, चोऱ्या, मारामाऱ्या, अवैध धंदे यासारखे गुन्हे उपविभागात लक्षणीय आहेत. या सर्व गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्याचे काम पंकज कुमावत यांना करावे लागणार असून उपविभागतील सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
दरम्यान, मूळचे राजस्थान येथील असलेले पंकज कुमावत हे 2019 च्या बॅच चे आयपीएस अधिकारी आहेत. दि.१९ रोजी त्यांनी केज येथे आपल्या पदाचा अधिभार घेतला असून उपविभागातील परिस्थितीचा आढावा घेत लागलीच कामाला सुरुवात केली आहे.