केज दि.21 – धरणात येणाऱ्या पाण्याच्या परिक्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने मांजरा धरण 100% भरले असल्याने पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील प्रमुख धरण काठोकाठ भरल्याने तीन जिल्ह्यांची पाण्याची चिंता मिटली आहे. दि.21 रोजी दुपारी 1 वाजता धरण 100% भरले. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी कार्यकारी अभियंता यांच्या सुचने नुसार मांजराच्या उजव्या कालव्यातून 1.27 प्रति सेघमी विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती अभियंता शाहूराज पाटील यांनी दिली.