Site icon सक्रिय न्यूज

उपचारादरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू……!

उपचारादरम्यान पीडित अल्पवयीन मुलीचा मृत्यू……!

Stop Sexual abuse Concept, stop violence against Women, international women's day

लातूर दि.21 – लातूरच्या शासकीय रुग्णालयात परभणी जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप असून त्यानंतर तिने विषारी औषध प्यायले होते. गँगरेप प्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी जोर धरत आहे.

परभणी जिल्ह्यातील सोनपेठ तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीचा लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. या तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याचा आरोप आहे. अत्याचारानंतर आरोपीने मोबाईलमध्ये तिचा व्हिडीओ शूट केला आणि बदनाम करुन त्रास देण्याची धमकीही दिली.आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडितेने विषारी औषध घेतले होते. लातूरच्या शासकीय रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते, मात्र सोमवारी तिची प्राणज्योत मालवली. त्यानंतर भाजपाच्या उपाध्यक्षा स्वाती जाधव यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली.पीडित मुलगी ही एका महाविद्यालयात शिक्षण घेत होती. गावातील मुलगा आदर्श शिंदे हा पीडितेची वारंवार छेड काढायचा. पीडितेने याबाबत आपल्या कुटुंबियांना माहिती दिली. पीडितेच्या कुटुंबियांनी आदर्शला समजावून सांगितलं. त्यानंतर सर्व प्रकरण मिटलं असेल, असं पीडितेच्या कुटुंबियांना वाटलं. पण प्रकरण मिटण्याऐवजी आणखी चिघळलं होतं.

14 सप्टेंबरला दुपारी एक वाजता पीडितेने विषारी द्रव्य प्राशन केलं. त्यामुळे पीडितेला उलट्या होऊ लागल्या. पीडितेच्या आईने तिला त्यामागील कारण विचारलं असता तिने विष प्राशन केल्याचं सांगितलं. पीडितेच्या आईने तातडीने घरातील इतर सदस्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पीडितेला तातडीने आंबेजोगाई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे प्राथमिक उपचारानंतर पीडितेला पुढील उपचारासाठी लातूरला नेण्यात आलं. पीडितेने जवळपास सहा दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. पण तिची ही झुंज अखेर अपयशी ठरली. लातूरच्या रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, पीडितेने आत्महत्या करण्याचा का प्रयत्न केला? याबाबतची माहिती तिने स्वत: 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता आपल्या भावाला सांगितली होती. पीडितेने भावाला दिलेल्या माहितीनुसार, 12 सप्टेंबर रोजी दुपारी एक ते सायंकाळी पाच या दरम्यान आदर्श शिंदे याने फोन करुन तरुणीला गावाजवळील एका पडक्या शाळेत बोलावले. यावेळी तिथे त्याच्यासोबत मयुर मुंजा मुठाळ, सुशिल भागवत शिंदे हे दोघंही होते. त्या तिघांनी मिळून पीडितेवर बलात्कार केला. त्यामुळे मानसिकरित्या खचलेल्या पीडितेने 14 सप्टेंबरला दुपारी 1 वाजता विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.

शेअर करा
Exit mobile version