केज दि.२३ – आपल्या शैक्षणिक योगदानामुळे केज तालुक्यातील शिक्षिकांना आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाल्याबद्दल शहरातील चैतन्य ज्वेलर्स तसेच धपाटे कुटुंबियांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी दिपाली केजकर, महादेवी फुलसुरे, सावित्रा श्रीमंगले, नैना शिंदे,ज्योती शिंदे, सुरेखा चौधरी इत्यादी आदर्श शिक्षिकांचा सत्कार मोहन धपाटे व सीमा धपाटे या दाम्पत्याच्या वतीने दि.२२ रोजी सायंकाळी करण्यात आला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी धनराज सोनवणे, संजय चवरे, श्री.भोसले, कांबळे, चाकूलकर, मुळे यांच्यासह अन्य नागरिकांची उपास्थिती होती.