केज दि. 24 – हवामान खात्याने इशारा दिल्यानुसार मराठवाड्यात सर्वदूर पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यात सर्वच भागात धोधो कोसळला असून केज तालुक्यात तर अतिवृष्टी झाली आहे.
दि.२३ रोजी रात्री दमदार पावसाला सुरुवात झाली होती. केज तालुक्यात सर्वच मंडळात अतिवृष्टी झाली असून शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन सारखी पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दरम्यान तीन दिवसांपूर्वी 100% भरलेल्या मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले होते. परंतु रात्री झालेल्या अतिवृष्टीने पाण्याची प्रचंड आवक वाढल्याने दि.२४ रोजी सकाळी धरणाचे सर्वच्या सर्व दरवाजे उघडून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू करावा लागणार आहे. तालुक्यातील सर्वच नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.