केज दि.२५ – तू एक लाख ८० हजार रुपये का देत नाहीस असे म्हणत एका महिलेस लाथाबुक्याने मारहाण करीत डांबून ठेवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना केज तालुक्यातील चिंचोलीमाळी येथे घडली. याप्रकरणी सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
चिंचोलीमाळी येथे वास्तव्यास असलेल्या मैनाबाई बबन पवार ( वय ४५ ) या महिलेस याच गावातील ज्ञानोबा डिगा पवार, सुनील ज्ञानोबा पवार, पापा ज्ञानोबा पवार, अशोक ज्ञानोबा पवार, अशोक ज्ञानोबा पवार, सुरज ज्ञानोबा पवार, अच्युत डिगा पवार, नितीन अच्युत पवार या सात जणांनी ३० ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास तिच्या घरी येऊन तू एक लाख ८० हजार रुपये का देत नाहीस असे म्हणत लाथाबुक्याने मारहाण करीत डांबून ठेवले. तू तेवढे पैसे दिले नाहीस तर तुला व तुझ्या घरातील लोकांना जीवे मारू अशी धमकी दिली. अशी फिर्याद मैनाबाई पवार यांनी २४ सप्टेंबर रोजी रात्री दिल्यावरून वरील सात जणांविरुद्ध केज पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस नाईक अशोक गवळी पुढील तपास करत आहेत.