Site icon सक्रिय न्यूज

केज तालुक्यातील सावळेश्वर – पैठण येथे रास्ता रोको……!

केज तालुक्यातील सावळेश्वर – पैठण येथे रास्ता रोको……!
 केज दि.30 – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पावसाच्या सरासरी नुसार नुकसान ग्राहय धरून 100% नुकसान भरपाई देण्याच्या मागण्यांसाठी शुक्रवारी दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता अंबाजोगाई -कळंब राज्य महामार्गावर सावळेश्वर -पैठण येथे रास्ता रोको आंदोलन  करण्यात येणार आहे.
                       तालुक्यात गेल्या 15 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने नदी, नाले, ओढे, तलाव, सांडवे, बंधारे, फुटुन प्रचंड प्रमाणात ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत. नदी काठच्या  शेतीजमीनी पिकांसह खरडून वाहुन गेल्या आहेत. 5 ते 10 फूट खोल जमीन खरडून वाहून गेल्याने संबधित शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुराचे पाणी गावांत घुसल्याने घरे, जनावरे वाहून गेलीत. तसेच सखल भागातील जमिनीत पाण्याचा निचरा होत नसल्याने मोठ्या स्वरूपात पाणी साचून ऊस, सोयाबीन, मूग आदी पीके संपूर्ण वाया गेली आहेत.नुकसान ग्रस्त भागांचे  पंचनामे करण्यास मा. जिल्हाधिकारी, बीड यांनी यापूर्वीच महसूल, कृषी, ग्रामविकास, जिल्हा परिषद  यंत्रनेला निर्देश दिले असले तरी संबंधित मंडळ अधिकारी, कृषी अधिकारी,  गटविकास अधिकारी,  ग्रामसेवक अद्यापही नुकसान ग्रस्त भागात पोहोचले नाहीत. त्यामुळे या आंदोलनात सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय विधि आघाडी प्रमुख ऍड. सुधीर चौधरी,मावळा विचार मंचचे गोविंद शिनगारे, छावा मराठा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ठोंबरे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठोंबरे, तालुकाध्यक्ष राहुल खोडसे, मांजरा विकास प्रतिष्ठान चे प्रवीण खोडसे, मराठा महासंघाचे दत्ता शिनगारे, सरपंच रुस्तुम चौधरी, सरपंच पिंटू मस्के, उप सरपंच अंकुश करपे, सरपंच शिवाजी शिंपले, संदीप करपे, सरपंच प्रवीण पवार, सरपंच गणेश राऊत ,अशोक भोगजकर, सरपंच सुधीर रानमारे, संतोष सोनवणे, हनुमंत सौदागर, नवनाथ अंबाड, प्रमोद पांचाळ, सुनील शिनगारे, घनश्याम साखरे, प्रशांत चौधरी, अशोक साखरे, नवनाथ काकडे, सुग्रीव करपे, अविनाश करपे, दिगंबर करपे, गोविंद करपे, ताराचंद गायकवाड आदींनी केली आहे.
प्रमुख मागण्या ……!
१)अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु.तात्काळ नुकसानभरपाई द्यावी,
२)गतवर्षी चा (2020)चा थकीत खरिप पीकविमा तात्काळ वाटप करावा,
३)पुराने ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांना ऑगस्ट 2019 च्या शासन अध्यादेशा प्रमाणे भरीव नुकसानभरपाई द्यावी.
४)चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून 25%अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करुन 100%पीकविमा मंजूर करावा.
५)पुराच्या पाण्याने रस्ते ,पूल वाहुन गेलेत त्यांची नव्याने मंजूरी घेऊन प्रत्यक्ष काम चालु करावे ,आवश्यक ठिकाणी पुलांची उंची तात्काळ वाढवून काम चालू करावे.
६)पिककर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ती सह वाटपास गती द्यावी.
७)नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाई साठी विमा कंपनी कडून लादलेल्या जाचक रद्द करून सरसकट भरपाई देण्यात यावी.
8)अंबाजोगाई-कळंब राज्य रस्त्यावरील सावळे श्वर-पैठण येथील धोका दायक व जीर्ण झालेला पूल तात्काळ नव्याने बांधण्यात यावा.
9)अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या राहत्या घरांची पडझड, संसारोपयोगी साहित्य ,पशुधन ,शेती आवजारे यांची नुकसान भरपाई तात्काळ द्या!!
शेअर करा
Exit mobile version