केज दि.30 – अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे पावसाच्या सरासरी नुसार नुकसान ग्राहय धरून 100% नुकसान भरपाई देण्याच्या मागण्यांसाठी शुक्रवारी दि.1 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता अंबाजोगाई -कळंब राज्य महामार्गावर सावळेश्वर -पैठण येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
कोल्हापूर, सांगली,साताऱ्याच्या धर्तीवर 2019 मध्ये जो शासनाने जीआर काढला होता त्याच धर्तीवर मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मदत करा अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू असे यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेडचे राहुल खोडसे यांनी केली
आंदोलनात खालील मागण्या करण्यात आल्या. यामध्ये १)अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रु.तात्काळ नुकसानभरपाई द्यावी,
२)गतवर्षी चा (2020)चा थकीत खरिप पीकविमा तात्काळ वाटप करावा,
३)पुराने ज्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या त्यांना ऑगस्ट 2019 च्या शासन अध्यादेशा प्रमाणे भरीव नुकसानभरपाई द्यावी.
४)चालू वर्षीच्या पीकविमा योजनेतून 25%अग्रीम रक्कम तात्काळ वाटप करुन 100%पीकविमा मंजूर करावा.
५)पुराच्या पाण्याने रस्ते ,पूल वाहुन गेलेत त्यांची नव्याने मंजूरी घेऊन प्रत्यक्ष काम चालु करावे ,आवश्यक ठिकाणी पुलांची उंची तात्काळ वाढवून काम चालू करावे.
६)पिककर्ज वाटपाचे उदिष्ट पूर्ती सह वाटपास गती द्यावी.
७)नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भरपाई साठी विमा कंपनी कडून लादलेल्या जाचक रद्द करून सरसकट भरपाई देण्यात यावी.
8)अंबाजोगाई-कळंब राज्य रस्त्यावरील सावळे श्वर-पैठण येथील धोका दायक व जीर्ण झालेला पूल तात्काळ नव्याने बांधण्यात यावा.
9)अतिवृष्टी ने नुकसान झालेल्या राहत्या घरांची पडझड, संसारोपयोगी साहित्य ,पशुधन ,शेती आवजारे यांची नुकसान भरपाई तात्काळ द्या!!
तसेच यावेळी प्रशासनास आंदोलन कर्त्या शेतकऱ्यांकडून नासुन गेलेलं सोयाबीन सह अन्य पिकांची झाड भेट स्वरूपात दिली यावेळी उपस्थित स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय विधि आघाडी प्रमुख ऍड. सुधीर चौधरी,मावळा विचार मंचचे गोविंद शिनगारे,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष राहुल खोडसे,सचिन साखरे,मांजरा विकास प्रतिष्ठान चे प्रवीण खोडसे, मराठा महासंघाचे दत्ता शिनगारे,रमेश पोकळे, सरपंच रुस्तुम चौधरी, सरपंच पिंटू मस्के, उप सरपंच अंकुश करपे, शेखर थोरात,अरविंद थोरात,सरपंच शिवाजी शिंपले, संदीप करपे, सरपंच प्रवीण पवार, सरपंच गणेश राऊत ,अशोक भोगजकर, सरपंच सुधीर रानमारे,योगेश अंबाड, प्रमोद पांचाळ, सुनील शिनगारे, घनश्याम साखरे, प्रशांत चौधरी, अशोक साखरे, नवनाथ काकडे, सुग्रीव करपे, अविनाश करपे, दिगंबर करपे, गोविंद करपे, ताराचंद गायकवाड आदी होते. तसेच आंदोलनात सर्व नुकसानग्रस्त नायगाव, सौंदना इस्थळ, सावलेश्वर, पैठण, अवसगाव, वाकडी,आनंदगाव, भटुंबा,जवळबन, लाडेगाव येथील शेतकरी मोठया प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी नायब तहसिलदार सचिन देशपांडे यांनी निवेदन स्वीकारले तर चोख बंदोबस्त युसुफ वडगाव पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांनी ठेवला होता.