Site icon सक्रिय न्यूज

पोलीस कर्मचाऱ्याचे अपघाती निधन…..!

पोलीस कर्मचाऱ्याचे अपघाती निधन…..!
केज दि.१९ – तालुक्यातील सोनी जवळा येथील रहिवासी तथा धारूर पोलीसांत कर्तव्यावर असणारे पोलीस कर्मचारी बाळासाहेब रघुनाथ जोगदंड यांचे ऑन ड्युटी अपघाती निधन झाले असून त्यांचे वय अंदाजे 45 वर्षे होते.
           तालुक्यातील सोनीजवळा येथील बाळासाहेब जोगदंड हे निवडणूक ड्युटीवर होते. परंतु केज ते सोनीजवळा रस्त्यावर त्यांचे दि.१९ रोजी मोटारसायकल अपघातात निधन झाले आहे. अपघात झाल्यानंतर त्यांना केजच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले होते.मात्र तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठवण्यात आले. परंतु त्यांचे दुर्दैवी निधन झाले.
            दरम्यान अपघात नेमका कसा घडला हे अद्याप स्पष्ट झाले नसून घटनास्थळी केजचे एपीआय शंकर वाघमोडे, पोलीस कर्मचारी मतीन शेख, इनामदार, आघाव यांनी भेट दिली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
शेअर करा
Exit mobile version