#निधन वार्ता

उपचारादरम्यान पोलीस कर्मचाऱ्याचे निधन……!

9 / 100

केज दि.९ – तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवाशी तथा बीड पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे दिलीप मुकुंद राऊत यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय 57 वर्षे होते.

              तालुक्यातील कानडी माळी येथील रहिवाशी दिलीप मुकुंद राऊत हे मागच्या काही वर्षांपासून बीड पोलीस दलात कर्तव्यावर होते. ते सध्या बीड येथे पोलीस मुख्यालयात सेवा बजावत होते. परंतु मागच्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आणि त्यातच त्यांचा दिनांक 9 जून 2023 रोजी मृत्यू झाला.
           दिलीप राऊत हे अवघ्या दोन वर्षांमध्ये सेवानिवृत्त होणार होते. परंतु अल्पशा आजाराने त्यांचे वयाच्या 57 व्या वर्षी दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर शहरातील अंकुश नगर भागातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तर रक्षा सावडण्याचा कार्यक्रम दिनांक ११ जून रोजी सकाळी आठ वाजता राक्षशभुवन येथे ठेवण्यात आल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close