#Crimeक्राइम

पत्नीचा खून करून पुन्हा पतीने घेतले जाळून….! 

9 / 100 SEO Score

बीड दि. १८ -शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडीमधील एका महिलेचा अनैतिक संबंधला अडसर ठरू लागल्याने पतीनेच डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली होती. अखेर याप्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके शोध घेत असताना संबंधित इसामाने स्वतःच्या शेतातच जाळून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येतं आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडीमधील भिवसाबाई विष्णू कदम (वय-५७) या महिलेचा राहत्या घरात डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार पहाटे घडला होता. सोमवारी रात्री आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची दोन पथके आरोपीच्या अटकेसाठी मागावर होती. मात्र मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आनंदवाडीमधील विष्णू कदम याच्या शेतात आग लागल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एका इसमाचा मृतदेह जळून कोळसा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतदेह हा विष्णूचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पत्नीला रागाच्या भरात संपविल्यानंतर पतीने देखील टोकाचे पाऊल उचलले असल्याचे परिसरात चर्चीले जात आहे. या दुहेरी घटनेमुळे आनंदवाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close