आपला जिल्हा

माळेगाव येथे एस.टी. बस वेळेवर सुरू करा – राहुल सोनवणे

12 / 100 SEO Score

केज दि. १८ – तालुक्यातील माळेगाव येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता, कळंब-केज-कळंब एस.टी. बस माळेगाव येथे सकाळी ६:३० वाजेपर्यंत नियमितपणे सुरू करण्यात यावी, अशी मागणी बीड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी कळंब आगाराला अधिकृत पत्र दिले आहे.

माळेगाव येथील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षणासाठी दररोज कळंब आणि केज येथे ये-जा करतात. विद्यार्थ्यांना सकाळी वेळेत शाळेत व महाविद्यालयात पोहचणे अनिवार्य असते; परंतु योग्य वेळेत एस.टी. बस उपलब्ध होत नसल्यामुळे त्यांच्या नियमित शैक्षणिक वेळापत्रकावर गंभीर परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांचे हित आणि प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी, कळंबकडून केजकडे जाणारी बस मौजे माळेगाव (ता. केज, जि. बीड) येथे सकाळी ठीक ६:३० वाजेपर्यंत पोहचेल अशा प्रकारे वेळेचे तात्काळ नियोजन करावे, अशी आग्रही मागणी पत्रात करण्यात आली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close