केज दि.२३ – ओबीसी आरक्षण स्थगित झाल्यानंतर कांही वार्डाच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या.त्यानंतर निवडणूक आयोगाने अधिसूचना जाहीर करून 18 जानेवारीला उर्वरित वार्डात नव्याने आरक्षण जाहीर करून निवडणुका घेण्याचे आदेश दिलेले आहेत.
त्यानुसार आज उर्वरित चार वार्डाचे आरक्षण जाहीर झाले असून केज नगरपंचयात मध्ये 2 आणि 8 मध्ये महिलांसाठी तर 1 आणि 12 वार्डात सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे.त्यामुळे आता उर्वरित चार वार्डात नव्या आरक्षणानुसार निवडणूक होणार असून 21 तारखेला झालेल्या निवडणुकीचे आणि 18 जानेवारीला होत असलेल्या निवडणुकीचे निकाल 19 जानेवारीला जाहीर होणार आहेत.