केज दि.८ – येथील न्यू इंटेल कॉम्प्युटर्स याठिकाणी मंगळवारी सकाळी अकरा वाजता जागतिक महिला दिनानिमित्त केज शहर व परिसरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रणझुंजार महिलांचा सेंटरचे संचालक श्री. गणेश सत्वधर यांच्या वतीने सन्मान सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला.
केज येथील नामांकित न्यू इंटेल कम्प्युटर्स या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त केज तालुक्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लढवय्या महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कविता कराड मुख्याध्यापिका साने गुरुजी विद्यालय केज ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील नवचेतना सर्वांगीण विकास केंद्राच्या सर्वेसर्वा सौ. मनीषा घुले व सुरेखा भोसले सहशिक्षिका जि. प. प्रा. शा मसाजोग या होत्या. यावेळी यावेळी बोलताना कविता कराड यांनी महिलांनी आत्मनिर्भर व सशक्त होण्याचे आवाहन केले. तर मनीषा घुले यांनी महिलांचा आजच्या दिवसापुरता नव्हे तर नियमित समाजामध्ये सन्मान व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली, यावेळी केज तालुका युवा सेनेचे तालुका अध्यक्ष अरविंद थोरात, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष कैलास चाळक, संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष अभिषेक भिसे, सेंटरच्या संचालिका सौ. विजया सत्वधर, सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी बोरा, कौशल्या थोरात, पत्रकार दशरथ चवरे, रमेश गुळभिले, महादेव दळवी, नंदकुमार मोरे, महादेव जोगदंड संगणक प्रशिक्षक आकाश सत्वधर, विशाल पंडित, अंकुश बिक्कड यांच्यासह संगणक प्रशिक्षणार्थी मुली व मुले मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सेंटरचे संचालक श्री. गणेश सत्वधर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन कु. ऋतुजा चवरे यांनी केले व सूत्रसंचालन श्री. संस्कार कम्प्युटर एज्युकेशन सेंटरचे संचालक, दै. तरुण भारतचे केज तालुका प्रतिनिधी अनिल गलांडे यांनी केले.