#Social

केज शहरात महिला दिन उत्साहात साजरा….!

12 / 100
केज दि.१० – शहरातील न्यू इंटेल कॉम्प्युटर्स येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित महिलांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले.
           सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून पुरुषोत्तमदादा सोनवणे माध्यमिक विद्यालय सारणी येथील सहशिक्षिका उज्ज्वला शिंदे – लोमटे या होत्या तर प्रमुख पाहुण्या म्हणून सरस्वती कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती घुले, सहशिक्षिका श्रीमती साळुंके – ससाणे तसेच न्यू इंटेल कॉम्प्युटर्सच्या मार्गदर्शिका वंदना बनसोडे, सहशिक्षिका अश्विनी उगले – राऊत ह्या होत्या.
                 यावेळी न्यु इंटेल कॉम्प्युटर्स च्या 2023-2024 मधील एमएससीआयटी व टायपिंग मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थीनींचा पदक व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये मयुरी गलांडे, नेहा गुंड, वैष्णवी चवरे, प्रगती चवरे, अक्षदा चाळक, स्नेहा चाळक, निकिता चाळक, गायत्री तांदळे, तसेच स्टुडन्ट ऑफ बॅच साठी साक्षी कापरे, पुजा परळकर, शारदा मोरे, काजल शरद पवार या मुलींचा समावेश होता.
        कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्नेहा चाळक, अमृता शितोळे यांनी केले तर प्रास्ताविक संचालिका विजया सत्वधर व आभारप्रदर्शन गणेश सत्वधर यांनी केले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close