शिराळा दि.१५ – (अमोल पाटील) – कापरी, सुजय नगर ता. शिराळा येथील ओढ्यावरील पूल वर्षभरापासून जैसे थे अवस्थेत आहे.प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे.गेल्या वर्षी जुलै महिन्यात आलेल्या पूरात हा पूल कोसळला तेव्हापासून फक्त पाहणी दौरा झाला.काहिच कार्यवाही करण्यात आली नाही. याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात पडलेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील अनेक पूल वाहून गेले,शेतीचे मोठे नुकसान झाले.यामध्ये सुजयनगर (कापरी) येथील ओढ्यावरील पूल देखील कोसळला.त्यानंतर जवळपास वर्ष होत आले तरीही प्रशासनाने साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते.यामुळे नागरिकांना शिराळा येथे जाण्यासाठी बराच वळसा घालून जावे लागते.
दरम्यान, हा पूल १९९० च्या दशकात स्वर्गीय शिवाजीराव देशमुख आमदार असताना बांधला होता.त्यावेळी शिवाजीराव नाईक हे जि.प.अध्यक्ष होते.गेल्या वर्षीच्या पावसाने पूल ओढ्यातच कोसळला.यावरून धोका पत्करून लोक ये जा करत असतात.प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी हा पूल बांधून द्यावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.