Site icon सक्रिय न्यूज

प्रकाशराव राऊत यांचे निधन…..!

प्रकाशराव राऊत यांचे निधन…..!
केज दि.१४ – तालुक्यातील चिंचोली माळी येथील रहिवाशी तथा जेष्ठ राजकीय व्यक्तीमत्व प्रकाश आश्रूबा राऊत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असून मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते.
                प्रकाश राऊत हे काल बुधवार दि.१३ रोजी केशव महाराज यांच्या बरोबर नांदेड जिल्ह्यातील कळमनुरी बाळापूर येथे भागवत कथे निमित्ताने गेले होते. मात्र सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ते स्थानिकच्या दवाखान्यात गेले. मात्र डॉक्टरांनी त्यांना नांदेड येथे पुढील उपचारासाठी पाठवले होते.परंतू हृदयविकाराच्या तीव्र झटक्यात त्यांचे उपचार सुरू होण्यापूर्वीच बुधवारी रात्री निधन झाले. प्रकाश राऊत हे समता परिषदेचे एक सच्चे कार्यकर्ते म्हणून परिचित होते.
              चिंचोली माळी येथे त्यांच्यावर गुरुवारी सकाळी ९.३० वा. अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मोठा परिवार असून समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष ऍड.सुभाष राऊत यांचे ते चुलतभाऊ होते.
शेअर करा
Exit mobile version