Site icon सक्रिय न्यूज

न्यू इंटेल कॉम्प्युटर्स च्या विद्यार्थ्यांचे टॅली  परीक्षेत घवघवीत यश….!

न्यू इंटेल कॉम्प्युटर्स च्या विद्यार्थ्यांचे टॅली  परीक्षेत घवघवीत यश….!
केज दि.२३ – तालुक्यातील नामांकित व सतत नेत्रदीपक यशाचे प्रवेशद्वार असलेल्या न्यू इंटेल कॉम्प्युटर्स या संगणक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी चालू महिन्यात एम‌. के. सी. एल कडून झालेल्या टॅली च्या परिक्षेत घवघवीत यश संपादन करुन महाराष्ट्रात डंका केला आहे. आणि या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल प्रा. उत्तरेश्वर जाधव, प्रा. विठ्ठल आवाड, प्रा. ज्ञानेश कलढोणे सर यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवारी दुपारी इंटेल कॉम्प्युटर्स केज याठिकाणी संपन्न झाला.
               यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रात दुसरे आलेले कु. खुरदामोजे यादवी (98%), डोंगरे प्रतीक (98%), देवधारे नम्रता (95%), भैरट किशोर (94%),रोकडे जयपाल (91%) यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी न्यू इंटेल कॉम्प्युटर्स चे संचालक गणेश सत्वधर, विजया गणेश सत्वधर यांनी उपस्थितांचे आभार मानले.या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे व न्यू इंटेल कॉम्प्युटर्स चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version