Site icon सक्रिय न्यूज

बिजेपीच्या विधानपरिषदेच्या यादीतुन बीड जिल्हा वगळला……!

बिजेपीच्या विधानपरिषदेच्या यादीतुन बीड जिल्हा वगळला……!

बीड दि.८ – राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडेंना भाजपने पुन्हा एकदा धक्का दिला आहे. विधान परिषदेसाठीच्या यादीतून पंकजांचे नाव गायब झाले आहे. पंकजा मुंडे सोबतच आ. विनायक मेटे यांनाही भाजपने विश्रांती दिली आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी यादी जाहीर केली असून यात प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड यांना उमेदवारी दिली आहे.

              दरम्यान बीड जिल्ह्याला विधानपरिषदेसाठी स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकात नाराजीचा सुरू उमटत आहे. परंतु विधान परिषदेच्या यादीतून पंकजा मुंडे यांचे नाव वगळल्याने राष्ट्रीय स्तरावरच त्यांना काम करावे लागणार आहे. तर राम शिंदे यांच्या नावाने बिजेपीने ओबीसीला प्रतिनिधित्व दिल्याचे दिसत आहे.
शेअर करा
Exit mobile version