Site icon सक्रिय न्यूज

दुचाकींची समोरासमोर धडक, चौघे गंभीर…..!

दुचाकींची समोरासमोर धडक, चौघे गंभीर…..!
केज दि.५ – धारूर पासून तीन किमी अंतरावर धारूर आसरडोह रोडवर दोन दुचाकीची वळणाच्या ठिकाणावर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही दुचाकी वरील चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना  मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली .
            प्रदीप गंगाधर जायभाये (२४), राहुल गंगाधर जायभाये (२२) दोघे राहणार जायभायवाडी तसेच उमेश बिरू भोसले (३०), ओंकारेश्वर श्रीकांत भोसले (२८) अशी जखमींची नावे आहेत. या अपघातामध्ये एक दुचाकी बराशीत जाऊन पडली होती. जखमींना नागरीकांनी तात्काळ धारूर रुग्णालयात हलविले व धारूर ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे हलवण्यात आले आहे.
          सदर अपघात घडलेल्या ठिकाणी खड्डा असल्यामुळे तो  चुकवताना अपघात झाल्याचे बोलले जात होते.
शेअर करा
Exit mobile version