मुंबई दि.१ – महाराष्ट्रातील पत्रा चाळ घोटाळ्यातील आरोपी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने रात्री मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली. अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. राऊत रविवारी सायंकाळी 5.30 वाजता ईडी कार्यालयात पोहोचले होते. राऊतच्या अटकेनंतर त्यांचा भाऊ सुनील राऊत यांनी चुकीच्या पद्धतीने अटक करण्यात आल्याचे सांगितले. अटकेबाबत आम्हाला कोणताही कागद देण्यात आलेला नाही.
दरम्यान, संजय राऊत यांच्या अटकेविरोधात शिवसेना कार्यकर्त्यांनी पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर आणि जळगावमध्ये निदर्शने केली आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर पक्षाचे पदाधिकारी आणि नेत्यांची बैठक बोलावली आहे. तर राऊत यांना सकाळी 11 वाजता कोर्टासमोर हजर केले जाणार असून जामीन मिळतो की कोठडी याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.