केज दि.१२ – १५ ऑगस्ट २०२२ यावर्षी देशाच्या स्वातंत्र्य दिनाला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. यावर्षीचा स्वातंत्र्य दिन हा आपल्यासाठी खास असणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी कित्येक वीरांनी आपले बलिदान दिले. त्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे भारत सरकारच्या वतीने हर घर तिरंगा मोहीम ही राबविण्यात येत आहे. आणि यात केजच्या आधार माणुसकीचा फाउंडेशनने पण निःस्वार्थ सेवेचे व्रत जोपासले आहे.
आधार माणुसकीचा फाउंडेशन च्या वतीने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत आज पोलिस स्टेशन केज येथे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या हस्ते पोलिस स्टेशन येथील सर्व कर्मचाऱ्यांना राष्ट्रध्वज वाटप करण्यात आले.
यावेळी शंकर वाघमोडे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी व कर्मचारी त्याच बरोबर फाउंडेशनचे प्रताप वैरागे, विकास गवळी, डॉ.विवेक डोईफोडे, डॉ.निखिल भालेराव, महावीर पटेकर, राहुल पटेकर, निलेश तोडकर, अजित धपाटे, अमर धपाटे, परमेश्वर बोबडे, कृष्णा सूर्यवंशी उपस्थित होते.