देशविदेश

प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा……!

4 / 100
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला महत्त्वाचं आवाहन केलं आहे. पुढील महिन्यात 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट असे तीन दिवस आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलं आहे.
                पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आज एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की, स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आपन ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवत आहोत.
 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत देशभरात येत्या 9 ऑगस्टपासून आठवडाभर ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होऊन प्रत्येकाने आपल्या घरावर तीन दिवस राष्ट्रध्वज फडकावा आणि ‘हर घर तिरंगा’ मोहिमेला बळकटी द्यावी असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
          दरम्यान, 1947 साली आजच्या दिवशी म्हणजेच 22 जुलै रोजी आपण तिरंग्याचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकार केल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close