केज दि.७ – येथील रामकृष्ण परमहंस परिवाराचे संस्थापक वासुदेव खंदारे गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली तयार झालेले व राज्यातील महाराज मंडळीत टॉप फाईव्ह पैकी एक असले भागवताचार्य आणि रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनाच्या हव्यासापोटी वेळ अपुरा असल्यामुळे पुणे येथील वाघोली येथील कीर्तन महोत्सवात त्यांना सांगली येथून चक्क हेलिकॉप्टरने किर्तनासाठी आणण्यात आल्याच्या प्रसंगामुळे समाधान महाराज शर्मा हे चांगलेच चर्चेत आले आहेत.
केज तालुक्यातील रामकथाकार, कीर्तनकार हभप समाधान महाराज शर्मा यांची सध्या सांगली येथे रामकथा सुरू आहे. त्यांना पुण्यातील वाघोली परिसरातील श्रेयस मंगल कार्यालयात सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवात ही कीर्तन सेवा सादर करण्याचा आग्रह भाविकांनी केला होता. परंतु सांगली येथील रामकथा गुरुवारी सायंकाळी 5 वाजता संपली. त्यानंतर खाजगी वाहनाने 247 किमी अंतरावर वाघोली येथे जाण्यासाठी 5 तास 17 मिनिटे लागणार असल्यामुळे वेळेवर येणे होणार नसल्याचा निरोपही महाराजांनी संयोजकांना दिला होता.परंतु वाघोली, पुणे येथील कीर्तन महोत्सवाचे आयोजक संताराम कटके व मित्र परिवार भाविकांनी महालक्ष्मी कंपनीच्या हेलिकॉप्टरची व्यवस्था केली.आणि सांगली ते वाघोली हे अंतर अवघ्या 45 मिनिटात महाराजांनी पार केले.हेलिकॉप्टर मधून उतरताच महाराजांचे भव्य स्वागत करण्यात आले.
दरम्यान, समाधान महाराज शर्मा यांच्या कीर्तनचा लाभ भाविकांना मिळावा यासाठी कीर्तन महोत्सवाचे आयोजक शांताराम खटके, व हरिदास जोगदंड, रोहीदास कटके, सोमनाथ कटके, सोमनाथ गावडे गणेश हारगुडे यांनी पुढाकार घेतला.