ब्रेकिंग

प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी 50 ते 55 जणांवर गुन्हा दाखल…..!

10 / 100
केज दि.२८ –  तालुक्यातील औरंगपुर येथील पावनधाम येथे तुकाराम बीज निमित्त दर्शनासाठी आलेल्या भाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मराठा आरक्षण समर्थक आंदोलकांनी काळे झेंडे दाखवून घोषणाबाजी करून त्यांचा ताफा अडविल्या प्रकरणी सुमारे ५० ते ५५ जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
दि. २७ मार्च रोजी दुपारी १:३० वा. च्या सुमारास भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे या केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाजोगाई-कळंब रोडवर असलेल्या औरंगपूर येथील पावनधाम येथे तुकारामबिज निमित्त आयोजित धार्मिक कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यांनी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतल्या नंतर त्या शेजारच्या सभा मंडपात मठाधिपती ह.भ.प. महादेव महाराज बोराडे यांचे सूरु असलेले कीर्तन ऐकण्यासाठी जात असताना मराठा आरक्षण समर्थक जमावातील कार्यकर्त्यानी त्यांना काळे झेंडे दाखवून एक मराठा लाख मराठा आशा घोषणा दिल्या. त्यामुळे तेथे काही काळ गोंधळाची व तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी घोषणाबाजी करणार्‍या कार्यकर्त्यावर सौम्य लाठीमार केला होता.

सदरील प्रकरणी युसुफवडगाव पोलीस ठाण्यात गोपनीय शाखेचे पोलीस शिपाई योगेश समुद्रे यांच्या फिर्यादी वरून जवळबन येथील दिपक दिगांबर करपे, गणेश विठठल करपे, शिवाजी ऊर्फ सतिष सुंदरराव करपे, संदीप अंकुश करपे, निलेश वसंत करपे, भैय्या संजय गायकवाड, अक्षय जनक करपे, अमोल श्रीराम करपे, अभिषेक अविनाश करपे, श्रीराम राजाभाऊ गायकवाड, नानासाहेब राजाभाऊ मोरे, बालासाहेब बाबासाहेब रंदवे, प्रशांत शिवाजी करपे, विकास राजाभाऊ करपे, ओमकार दत्तात्रय करपे, राहुल श्रीराम करपे, विकास बाबुराव करपे, अमोल शिवाजी करपे तसेच कैलास चव्हाण (रा. पळसखेडा), मधुकर साखरे (रा. कानडी बदन), योगेश संभाजी मस्के आणि सचिन मस्के दोन्ही (रा. सावळेश्वर) गोविंद बालासाहेब गायकवाड आणि रवि गायकवाड दोन्ही (रा. आनंदगाव) या चोवीस जणांसह इतर २५ ते ३० अशा ५० ते ५५ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

दरम्यान, जमावाने जिल्हा दंडाधिकारी यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघंन केले म्हणुन त्यांच्या विरुध्द गु र नं ७२/२०२४ भा दं वि ३४१, ३४३, १४७, १४९, १८८ महाराष्ट्र पोलीस कायदा १३५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस जमादार रामधन डोईफोडे हे तपास करीत आहेत.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close