Site icon सक्रिय न्यूज

उद्धव राऊत यांना मातृशोक…..!

उद्धव राऊत यांना मातृशोक…..!
केज दि.१२ – तालुक्यातील कानडी (माळी) येथील जेष्ठ नागरिक पद्मीनबाई बाबुराव राऊत यांचे वृद्धापकाळाने दि. १२ जानेवारी रोजी दु:खद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ९० वर्षे होते.
           अत्यंत मनमिळावू, प्रेमळ आणि कष्टाळू स्वभावामुळे त्या सुपरिचित होत्या. शांत, आपुलकी च्या स्वभावामुळे गावातील प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर, प्रेम होते.  पद्मीनबाई राऊत यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात वीस वर्षे सेविका (दाई) म्हणून सेवा बजावली.
         त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, दीर, भावजया, सुन, नातंवडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. जि.प.प्रा. शाळेचे सहशिक्षक उध्दव राऊत यांच्या त्या आई होत. त्यांच्यावर गुरूवारी दुपारी २.३० वाजता कानडीमाळी येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिंद्रुड (ता. माजलगाव) येथील पत्रकार नागेश वकरे यांच्या त्या आज्जी होत.
शेअर करा
Exit mobile version