केज दि. २१ – तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालयात व्यवसाय मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी व राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. राजेश गायकवाड यांनी व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाबासाहेब गोरे हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून समर्थ ड्रायव्हिंग स्कूल व अंकुर पाळणाघर, अंबाजोगाईच्या संचालिका संजीवनी देशमुख उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना श्रीमती देशमुख यांनी विद्यार्थ्यांना व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन करून कोणत्याही क्षणी व्यवसाय सुरू करून यशस्वी होऊ शकता याविषयी विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांनी कौशल्यावर आधारित व्यवसायाविषयी आपली भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. राजेश गायकवाड यांनी केले तर प्रा. मीनाक्षी उबाळे यांनी आभार मानले.