#Social

बुवासाहेब पाटील विद्यालयात मार्गदर्शन शिबीर संपन्न…..!

7 / 100
केज दि.१२ – तालुक्यातील शिंदी येथील बुवासाहेब पाटील विद्यालयात जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विविध विषयावर व्याख्यान आयोजित केले होते .
              कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य सदाशिव मुंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून छगन  महाराज खडके, ॲड. ए. एन . नागरगोजे, प्रा. विक्रम इनकर, डॉ. संजय मुंडे, परळीचे मु. अ . श्रीराम मुंडे हे होते .
              विद्यार्थ्यांना आरोग्य, NEET परीक्षा स्पर्धा परीक्षा यावर सविस्तर
डॉ. संजय मुंडे यांनी मार्गदर्शन केले.ॲड. ए. एन. नागरगोजे यांनी बाल गुन्हेगारी व त्याचे दुष्परिणाम या विषयावर सविस्तर व्याख्यान केले .
प्रा. विक्रम इनकर यांनी बाल विवाह संदर्भात जनजागृती करून विद्यार्थ्यांना शपथ दिली. श्रीराम मुंडे यांनी अध्ययन प्रक्रिया व्यवस्थापन व शिस्त यावर सविस्तर मार्गदर्शन केले .
                   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सदाशिव मुंडे यांनी केले सूत्रसंचालन विनायक घोळवे, आभार हरिभाऊ कांबळे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील प्राध्यापक  शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. शिबीराची सांगता पसायदानाने झाली.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close