इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत उत्तरेच छापल्याचे समोर आले होते.मात्र पुन्हा हिंदी विषयाच्या पेपर मध्येही घोळ झाल्याचे समोर आले असून गुणांकणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बुधवारी झालेल्या हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. मात्र, या शब्दांचे क्रमांक १,२,१,२ असे देण्यात आले. ते १,२,३,४ असे असायला हवे होते. तर चार समानार्थी शब्द लिहिण्यासाठी दिलेल्या चारही शब्दांना १,१,१,१ असे क्रमांक देण्यात आले आहेत. हे १,२,३,४ असे असायला हवे होते. परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न क्रमांक लिहून उत्तरे लिहिणे अपेक्षित असताना, प्रश्न क्रमांकातच घोळ झाल्यावर गुणदान कशाचे आणि कसे होणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.