#Accident

धारूर घाट ठरतोय अपघाताचे माहेरघर……!

धारूर दि.१५ – शहरातील घाटामध्ये पुन्हा एकदा आज सकाळी ११ वाजता अरुंद रस्त्यामुळे ट्रक पलटी झाला आहे यामुळे अपघाताची मालिका आणखी धारूरच्या घाटामध्ये सुरूच आहे घाट रुंदीकरणाचे महत्त्वाच्या बाबीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे.

                   धारूर येथील घाटामध्ये आज सकाळी ११ वाजता टेंभुर्णी हुन साखर घेऊन परभणीला जाणारा ट्रक क्रमांक एम एच २२ एल ०० ३२ हा पलटी झाला आहे. आपल्या समोरून येणार्‍या बसला वाचवण्याच्या नादात ट्रक पलटी झाला आहे घाटातून जाणारा रस्ता अरुंद असल्यामुळे दोन वाहने बसत नाहीत त्यामुळे वारंवार अपघात घडून मृत्यू होत आहेत या अपघातांमध्ये  वाहन चालक अशोक सुरवसे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सर्व साखरेचे पोते  खाली पडून नुकसान झाले आहे .वारंवार अपघात होत असल्याने अनेक वर्षापासूनची रुंदीकरणाची मागणी आहे तरीदेखील या मागणीकडे शासन प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. रस्ते दुरुस्तीसाठी शासनाला आणखी किती बळी हवे आहे असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. 

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close