Site icon सक्रिय न्यूज

आज पुन्हा एका तरुणाचा अपघाती मृत्यू…..!

आज पुन्हा एका तरुणाचा अपघाती मृत्यू…..!

केज दि.१४ – टँकर दुचाकी अपघातात येवता ता.केज येथील तरुणाला बुधवारी जीव गमवावा लागला होता. तोच पुन्हा एका अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दि.14 एप्रिल सकाळी नऊच्या सुमारास धारूर येथे घडली. जखमीला अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे.( one youth died on the spot and another injured. )

धारुर शहरातील अंबाजोगाईकडे जाणाऱ्या राज्य रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. मयत तरुणाचे नाव प्रेमनाथ दादाराव गायकवाड (वय 26) तर जखमी तरुणाचे नाव प्रवीण अंकुश लोखंडे (वय 26) असे आहे. दोघेही तरुण आवरगाव येथील रहिवासी असुन धारुरहून आवरगावकडे आपल्या मोटारसायकल वरुन निघाले होते.

दरम्यान मयताचे शव धारुर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. ऐन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी अपघातात तरुणाला नाहक जिव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

शेअर करा
Exit mobile version