#Accident

दुचाकी अपघातात पुन्हा एक युवक ठार….!

9 / 100
केज दि.२७ – गुरुवारी तालुक्यातील युसूफ वडगाव नजीक एका युवकाचा दुचाकी ट्रॅक्टर अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली.आणि त्यातच पुन्हा नेकनूर ते मांजरसुम्भा दरम्यान तालुक्यातील बेंगळवाडी येथील दुचाकी वरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
                तालुक्यातील बेंगळवाडी येथील महादेव त्रिंबक पवार (अंदाजे वय 35) हा तरुण शुक्रवारी सायंकाळी नेकनूर ते मांजरसुम्भा दरम्यान आपल्या दुचाकीवरून चालला असता अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात महादेव पवार हा गंभीर जखमी झाला. घटना घडल्यानंतर सदरील तरुणाला नेकनूर येथील दवाखान्यात उपचारार्थ दाखल केले. नेकनूर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी बीड येथे हलवण्यात आले होते.परंतु वाटेतच सदर तरुणाचा मृत्यू झाला.
            दरम्यान, दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close