Site icon सक्रिय न्यूज

केज कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार असल्याची चर्चा….!   

केज दि.२४ – तालुक्याचा विचार केल्यास बहुतांश ग्रामपंचायती व सोसायटी संस्था ह्या रमेशराव आडसकर तथा मुंदडा यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आहेत. तसेच शेतकरी विकास पॅनल मध्ये सर्वसमावेशक उमेदवार असल्यामुळे तीन जागा बिनविरोध निघाल्या.
                  पॅनलचे नेतृत्व पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, आमदार नमिताताई मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, रमेशराव आडसकर, अंकुशराव इंगळे या दिग्गजांचे असल्यामुळे  कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक एकतर्फी होणार असल्याचे चर्चा केज तालुक्यात सर्वत्र होत आहे.
शेअर करा
Exit mobile version