#Election

बळीराजा पॅनलची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचारात मुंसडी…..!

6 / 100
केज दि.२६ – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिशंकु निवडणुकीची रनधुमाळी सुरु आहे. गावपातळीवर भेटी गाठी तसेच बैठकांना वेग वाढलेला आहे.
              केज कृषी उत्पन्न समितीचे मतदान (दि.२८) एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते धनजंय मुंडे यांच्या नेतृत्वात बजरंग सोनवणे तसेच  महाविकास आघाडीच्या सुशिलाताई मोराळे, नंदकुमार मोराळे , भैय्यासाहेब पाटील, रत्नाकर शिंदे, भाई मोहन गुंड, माजी सभापती बालासाहेब जाधव आदि बळीराजा परिवर्तन पॅलनच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक मतदारांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधुन समस्या समजून घेत आहेत. मतदारराजा देखील त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन प्रचार करत असल्यामुळे तसेच केज तालुक्यातील बहुतांश सेवा सोसायटी, ग्रामपंचायतवर बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणूकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र केज तालुक्यातील जनतेला पाहावयास मिळत आहे. त्यामुळे बळीराजा परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी होऊन परिवर्तन होणार अशीच चर्चा आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close