केज दि.२६ – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिशंकु निवडणुकीची रनधुमाळी सुरु आहे. गावपातळीवर भेटी गाठी तसेच बैठकांना वेग वाढलेला आहे.
केज कृषी उत्पन्न समितीचे मतदान (दि.२८) एप्रिल रोजी होत असून या निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते धनजंय मुंडे यांच्या नेतृत्वात बजरंग सोनवणे तसेच महाविकास आघाडीच्या सुशिलाताई मोराळे, नंदकुमार मोराळे , भैय्यासाहेब पाटील, रत्नाकर शिंदे, भाई मोहन गुंड, माजी सभापती बालासाहेब जाधव आदि बळीराजा परिवर्तन पॅलनच्या माध्यमातून तालुक्यातील प्रत्येक मतदारांना भेटत आहेत. त्यांच्याशी संवाद साधुन समस्या समजून घेत आहेत. मतदारराजा देखील त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावुन प्रचार करत असल्यामुळे तसेच केज तालुक्यातील बहुतांश सेवा सोसायटी, ग्रामपंचायतवर बजरंग सोनवणे यांचे वर्चस्व असल्यामुळे त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणूकीच्या प्रचारात जोरदार मुसंडी घेतल्याचे चित्र केज तालुक्यातील जनतेला पाहावयास मिळत आहे. त्यामुळे बळीराजा परिवर्तन पॅनलचे सर्व उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विजयी होऊन परिवर्तन होणार अशीच चर्चा आहे.