Site icon सक्रिय न्यूज

सहशिक्षक वृषिकेत संगेवार यांचे निधन….!

केज दि.२० – शहरातील उमरी रोडवरील सहयोग नगर मध्ये वास्तव्यास असणारे जिल्हा परिषदेचे शिक्षक वृषिकेत संगेवार यांचे दुःखद निधन झाले असून मृत्यू समयी त्यांचे वय 50 वर्षे होते.

            तालुक्यातील लहुरी केंद्रांतर्गत येणाऱ्या हनुमान वस्ती या शाळेवर संगेवार हे सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. मूळचे उदगीर येथील रहिवाशी संगेवार हे मागच्या काही वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर बार्शी येथे उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी (दि.२०) पहाटे चारच्या दरम्यान राहत्या घरी त्यांचे निधन झाले.                 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. उदगीर येथे त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
शेअर करा
WhatsappFacebookTwitter
Exit mobile version