केज दि.१४ – तालुक्यातील कानडी माळी येथील एक 43 वर्षीय महिला मागच्या दीड महिन्यापासून बेपत्ता आहे. पोलिसांमध्ये तक्रार दिली असून अद्यापतरी अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. तालुक्यातील कानडी माळी येथील संगीता प्रमोद राऊत ही 43 वर्षे महिला थोडीशी मानसिक आजाराने ग्रस्त आहे. त्यातच ती दिनांक 22 जून 2023 रोजी घरातून साडीला पिको फॉल करून आणते म्हणून निघून गेली. मात्र रात्री उशिरापर्यंत ती घरी न आल्याने तिचा पती प्रमोद यांनी गावात शोध घेतला, नातेवाईकांकडे विचारपूस केली परंतु सदर महिलेचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
दरम्यान, प्रमोद सत्यविजय राऊत यांनी 24 जून रोजी केज पोलिसात पत्नी हरवल्याची तक्रार दिली असून पोलीस शोध घेत आहेत. मात्र सदरील महिलेचा अद्याप शोध लागलेला नाही. पाच फूट उंचीची मजबूत बांध्याची महिला गळ्यात सोन्याचे मनी मंगळसूत्र तसेच कानात सोन्याचे दागिने घालून बाहेर पडलेली आहे. तर अंगावर शेवाळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. सदरील महिला कोणाला दिसून आली तर केज पोलिसांशी तात्काळ संपर्क साधावा असे आव्हान केज पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आलेली आहे.