#Missing

केज शहरातून तीन बालकांसह दोन महिला बेपत्ता…..!

1 / 100
केज दि.१७ – शहरातील दोन वेगवेगळ्या भागातून तीन बालकांसह दोन महिला बेपत्ता झाल्याची नोंद पोलीसांत करण्यात आली असून सदरील घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
             शहरातील शिक्षक कॉलनी भागातील अनिता युवराज कांबळे ही  महिला तिच्या दिव्या व आशिष या दोन लेकरांसह दि.२५ जुलै पासून बेपत्ता आहे. सदरील महिलेचा कुटुंबीयांनी शोध घेतला परंतु शोध न लागल्याने केज पोलीसांत खबर दिली आहे. ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक श्री. चौधरी हे तपास करत आहेत.
            तर अन्य एका घटनेत शहरातील फुलेनगर भागातील अंकिता दीपक ढाकणे ही ३२ वर्षीय महिला तिच्या दोन वर्षीय मुलीसह दि. १५ ऑगस्ट रोजी स्कुटीवर घराबाहेर पडली होती. परंतु अद्यापपर्यंत सदर महिला घरी न परतल्याने तिच्याही कुटुंबीयांनी पोलीसांत तक्रार दिली असून सदर घटनेचा तपास ठाणे प्रभारी शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे हे करत आहेत.
             दरम्यान शहरातून दोन महिला अचानक गायब झाल्याने शहरात खळबळ उडाली असून सदर महिलांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close