केज दि.१७ – शहरातील शांत, संयमी, मितभाषी आणि यशस्वी उद्योजक सज्जन बापू अंधारे यांचे दुःखद निधन झाले आहे. सज्जन बापू अंधारे मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यातच त्यांची गुरुवारी सकाळी दि.१७ रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. सज्जन बापू अंधारे यांनी हॉटेल व्यवसायामधून तालुक्यामध्ये एक वेगळा ठसा उमटवला होता. हॉटेल व्यवसाय, बांधकाम व्यवसाय असेल यामध्ये ते उद्योजक म्हणून पुढे आले होते. मागच्या काही दिवसांपासून ते आजारी असल्याने लातूर येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आले. परंतु दिनांक 17 ऑगस्ट रोजी त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर सोनी जवळा रोडवरील स्मशानभूमीत दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.