केज दि.29- मागच्या काही वर्षांपासून केज शहरातील नामांकित हनुमान ज्वेलर्स च्या वतीने ग्राहकांच्या हितासाठी एक लकी ड्रॉ स्कीम राबवल्या जाते. आणि या स्कीमनुसार या महिन्यातील मोबाईल विजेते ठरले आहेत केज तालुक्यातील टाकळी येथील घुले कुटुंबीय.
शहरातील हनुमान ज्वेलर्सच्या वतीने ग्राहकांसाठी लकी ड्रॉ स्कीम चालवल्या जाते. एका महिन्यामध्ये कमीत कमी पाचशे रुपयांची जे ग्राहक खरेदी करतील त्यांना एक कुपन दिले जाते. आणि एका महिन्यामध्ये जे काही कुपन संकलित होतील त्या कूपणामधून एक भाग्यवान ग्राहक निवडला जातो. आणि या महिन्यांमध्ये दिनांक 26 नोव्हेंबर 2023 ते 25 डिसेंबर 2023 दरम्यान संकलीत झालेल्या कुपनांमधून एक भाग्यवान ग्राहक निवडले गेले. आणि यामध्ये केज तालुक्यातील टाकळी येथील केशव बजरंग घुले हे भाग्यवान ग्राहक ठरले आहेत. त्यांना दहा हजार रुपये किमतीचा अँड्रॉइड मोबाईल ज्वेलर्स चे संचालक श्रीराम हेमंत रुद्रवार यांच्या हस्ते भेट देऊन सम्मानित करण्यात आले.
दरम्यान, हनुमान ज्वेलर्सच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या स्कीममुळे दिवसेंदिवस हनुमान ज्वेलर्स मधून खरेदी करण्यासाठी ग्राहक गर्दी करू लागलेले आहेत.
(Advt.)