केज दि.२७ – मागच्या आठवड्यामध्ये बीड जिल्ह्यातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. आतापर्यंत रिक्त झालेल्या जागेवर काही अधिकारी रुजू झाले असून काही जागा आणखीही नवीन अधिकारी रुजू झालेले नाहीत. मात्र केज तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस ठाण्याला मच्छिंद्रनाथ शेंडगे हे नवीन एपीआय रुजू झाले आहेत.
गेल्या आठवड्यामध्ये येणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी नवीन अधिकारी रुजू झालेले असले तरी काही ठिकाणी अद्याप पोलीस अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आहे. तर तालुक्यातील युसुफ वडगाव पोलीस स्टेशनला मागच्या काही वर्षांपासून कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी एपीआय योगेश उबाळे यांची जालना जिल्ह्यामध्ये बदली करण्यात आली आणि त्यांच्या जागी मुरूम येथून मच्छिंद्रनाथ शेंडगे हे एपीआय रुजू झाले आहेत.
मच्छिंद्रनाथ शेंडगे रुजू झाल्यानंतर बनसारोळा येथील सामाजिक कार्यकर्ते राजपाल काकडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्यासह बनसारोळा बीटचे बीट अंमलदार श्री, डोईफोडे तसेच श्री. घोरपडे, भीमा धायगुडे, धनाजी धायगुडे, कलीम सय्यद, बबन जोगदंड इत्यादी पोलीस कर्मचाऱ्यांचाही राजपाल काकडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या