आपला जिल्हा

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या…..!

12 / 100

बीड दि.१६ – मागच्या काही महिन्यापूर्वी केज पोलीस स्टेशनला रुजू झालेले पीआय बाळासाहेब पवार यांची केजहुन बदली झाली असून त्यांच्यासह युसुफ वडगाव पोलीस स्टेशनचे एपीआय योगेश उबाळे त्याचबरोबर नेकनूर पोलीस ठाण्याचे एपीआय विलास हजारे यांचीही बदली झाली आहे.

              जिल्ह्यातील पाच पोलीस निरीक्षक, 13 सहायक पोलीस निरीक्षक तर 11 पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश निघाले आहेत.यामध्ये अत्यंत शांत आणि कर्तव्यनिष्ठ केजचे पीआय बाळासाहेब पवार हे धाराशिव येथे बदलीवर गेले असून युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे तरुण आणि तडफदार एपीआय योगेश उबाळे यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे.नेकनूर पोलीस ठाण्याचे कार्यकुशल एपीआय विलास हजारे यांचीही धाराशिव येथे बदली झाली आहे.
           दरम्यान, बाळासाहेब पवार यांच्या जागी अद्याप कुणाच्या नियुक्तीचे आदेश आलेले नसून कुणाची वर्णी लागते याकडे केजकरांचे लक्ष आहे.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close