मुंबई दि.१४ – महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी होत असलेल्या निवडणूकीसाठी भाजपने आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत. यात दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस सोडून
भाजपात आलेल्या अशोक चव्हाण
यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर त्यांच्यासोबतच मेघना कुलकर्णी
आणि डॉ. अजित गोपछडे यांची
उमेदवारी जाहीर करण्यात आली
आहे. तर भाजप अध्यक्ष जे पी नड्डा
यांना गुजरातमधून उमेदवारी जाहीर
करण्यात आली.
महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी माजीमंत्री पंकजा मुंडेंसह अनेकांच्या नावांची चर्चा होती, पण भाजपने पुन्हा एकदा सर्वांना धक्का दिला आहे.