Site icon सक्रिय न्यूज

पुणे येथील सिंहगड कॉलेजच्या स्पेक्ट्रम मध्ये मुलींची चमकदार कामगिरी….!

पुणे येथील सिंहगड कॉलेजच्या स्पेक्ट्रम मध्ये मुलींची चमकदार कामगिरी….!
पुणे दि.१६ – सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पुणे या ठिकाणी सध्या विद्यार्थ्यांसाठी स्पेक्ट्रम सुरू आहे. सदरील स्पेक्ट्रम मध्ये  विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून यामध्ये ग्रामीण भागातील मुलामुलींनी आपली चमकदार कामगिरी दाखवत आपले कौशल्य दाखवून दिले आहे.
                 पुणे येथे अतिशय नामवंत अशा सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वडगाव या ठिकाणी स्पेक्ट्रमचे आयोजन करण्यात आलेले आहे. आणि यामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवले जातात. यामध्ये पेंटिंग,नृत्य स्पर्धा केसस्टडी इत्यादी उपक्रम राबवले जातात. त्याच उपक्रमामध्ये केसस्टडी नावाचा अतिशय कल्पक आणि अभ्यासू असा उपक्रम आहे. यामध्ये कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड च्या वतीने कॅस्त्रोल ऑईल इंडस्ट्रीजच्या समोरील समस्या, आव्हाने आणि उपाय योजना यावरही विद्यार्थ्यांचे मतं जाणून घेतले. त्याचबरोबर पेटीएम समोरील अडचणी आणि त्यावरील उपाय योजना हा विषय ही या स्पेक्ट्रम मध्ये ठेवण्यात आला होता. यामध्ये बीड जिल्ह्यातील केज तालुक्यासारख्या ग्रामीण भागातील पत्रकार डी. डी. बनसोडे यांची कन्या स्वप्नाली बनसोडे आणि मृणाल भोर या दोन विद्यार्थिनींच्या गटाने बाजी मारत दोन्हीही विषयावर अतिशय ओघवत्या शैलीमध्ये आणि अभ्यासू अशा प्रकारचे सादरीकरण या स्पेक्ट्रम मध्ये केले.
                         दरम्यान, त्यांच्या या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल सदरील स्पेक्ट्रम मध्ये स्वप्नाली बनसोडे आणि मृणाल भोर या दोघींच्या गटाला पाच हजार रुपये रोख पारितोषिक ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
शेअर करा
Exit mobile version