महाराष्ट्र

पुणे शहर हिंदी मराठी पत्रकार संघाच्या  अध्यक्ष पदी मुज्जम्मील शेख, उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता तर सचिव पदी राहुल हरपळे…!

6 / 100
पुणे दि.१५ – हिंदी मराठी पत्रकार संघाची पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये पुण्यातील धडाडीचे पत्रकार म्हणून ओळखले जाणारे युवा पत्रकार मुज्जम्मील शेख यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पुणे शहर अध्यक्ष पदी तसेच उपाध्यक्ष पदी सुरेश गुप्ता आणि सचिव पदी राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र हिंदी मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष धनश्री काटीकर यांनी दिले आहे.
                     मुज्जम्मील शेख ह्यांनी अनेक वृत्त संस्थेत त्यांनी काम केले आहेत. तसेच सध्या ते सध्या टाईम्स ऑफ महाराष्ट्र या वेबपोर्टलचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत आहेत. तसेच दैनिक हॅलो प्रभात या वृत्तपत्रात ते पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष पदी दक्ष पोलीस टाईम्स वृत्तपत्राचे पुणे विभागीय संपादक सुरेश गुप्ता आणि सचिव पदी न्युज प्रहारचे उप संपादक राहुल हरपळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्यानंतर सर्व स्तरावरून त्यांचे गौरव करण्यात येत आहे.
                     निवड झाल्यानंतर शेख यांनी सांगितले की, लवकरच हिंदी मराठी पत्रकार संघाची पुणे शहरात कार्यकारणी तयार करणार आहेत. यामध्ये नवीन देखील पत्रकारांना संधी देणार आहे व वरिष्ठ पत्रकारांना यामध्ये जबाबदारीचे स्थान ते उपलब्ध करून देणार आहेत. तसेच पत्रकारांच्या हितासाठी पुण्यात ते काम करणार आहेत. पत्रकारांच्या सन्मानासाठी आणि सुरक्षेसाठी ते काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेअर करा

डी डी बनसोडे

नमस्कार, सक्रिय न्युज मध्ये आपले स्वागत.सक्रिय न्युज च्या माध्यमातून सर्व वाचकांना विश्वसनीय व तत्पर बातम्या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक मताशी संपादक सहमत असेलच असे नाही.आपणही आपल्या परिसरातील बातम्यांसाठी व जाहिरातीसाठी 9822619553 या नंबरवर व्हाट्सएप तसेच कॉल करून संपर्क करू शकता.......धन्यवाद.....!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!
Close
Close